अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशाेक चव्हाण हे निवेदन घेऊन चर्चा करणार नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांच्या घरासमाेर आंदाेलन करणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाच्या कार्यकर्त्यांना पाेिलसांनी बळाचा वापर करून राेखले.
या घटनेचा मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. चव्हाण यांनी वेळाेवेळी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे.
समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण न करता समाजाचा विश्वासघात करत असल्याचा आराेप करत मराठा क्रांती माेर्चाचे कार्यकर्ते राज्यभर चव्हाण यांचा निषेध करीत आहेत.
चव्हाणांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजात नैराश्य निर्माण झाले असून, तरुण आत्महत्या करत आहेत. समाजाचाही एकही प्रश्न चव्हाण यांच्याकडून साेडवला जात नाही.
माेर्चाच्या कार्यकर्त्यांना गेटबाहेर बसवून त्यांनी समाजाचा अपमान केल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
महाविकास आघाडीने त्यांचा राजीनामा घेतला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.