मनपाची आर्थिक ऐपत नसल्याने खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-सिमेंट रोडवर डांबराचा थर टाकून रस्ता करण्याचं अजब काम नगरमध्ये सुरू आहे. पावसाळ्यात सिमेंटवरचं डांबर वाहून जाईल.

त्याला जबाबदार कोण? संबंधित कामाची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

शहरातील दिल्लीगेट ते नेप्ती चौक हा सिमेंटचा रस्ता असून तो ठिकठिकाणी उखाडला गेला आहे. काही ठिकाणी गजही उघडे पडल्याने धोकादायक वाहतूक सुरू आहे.

दरम्यान सिमेंट रोडवर डांबराचा लेअर टाकून हा रस्ता खड्डेमुक्त करण्यात आला आहे. त्यासाठी खास टेक्नीक वापरल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

रस्त्याची झाडलोट करून टॅगकोटमधून डांबर स्प्रे करण्यात आला. त्यानंतर डांबराचा लेअर टाकला. त्यावर पुन्हा डांबराचा सिलकोट केला जाणार आहे.

सिमेंटवर डांबर टाकू नये असं कुठही म्हटलेले नाही. शिवाय महापालिकेची आर्थिक ऐपत नसल्याने खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी मात्र त्याला आक्षेप घेतला आहे. कॉक्रीट रोडवर डांबर चालते का? असा सवाल करत गाडे यांनी कामाच्या दर्जावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला आहे.

सिमेंटच्या रोडवर डांबर टिकत नाही, त्यामुळे हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप योगीराज गाडे यांनी केला आहे. पावसाळ्यात हे डांबर वाहून जाईल.

मग त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत या कामाची चौकशी करावी अशी मागणी गाडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts