ताज्या बातम्या

मानलं भावा….! सिव्हिल इंजिनीरिंग केली पण नोकरीं नाही मिळाली; म्हणुन पट्ट्याने सुरु केले पशुपालन आज वर्षाकाठी कमवतोय 15 लाख

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Formal success story :- भारतात नवयुवक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचे स्वप्न बघत असतात. उत्तर प्रदेश मधील एका नव्या युवकाने देखील असे स्वप्न बघितले होते.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा जिल्ह्यातील रगडी असई गावात राहणारे आशुतोष दीक्षित यांनी 2017 मध्ये कानपूर येथील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणानंतर आशुतोषने देखील इतर नवयुवक विद्यार्थ्यां सारखे मोठं-मोठी स्वप्ने बघितली होती. आशुतोष स्वप्न होते की नोकरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह मोठ्या थाटात भागवायचा.

असे असले तरी नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वर्षभर सतत आशुतोष नोकरीसाठी वणवण भटकला पण आशुतोषला नोकरी मिळाली नाही.

पण जिद्दी आशुतोषने हार मानली नाही. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आणि त्यासाठी हवी असणारी सहनशीलता त्यांच्या मनात होती आणि म्हणूनच त्यांनी पशुपालनात (Animal Husbandry) हात आजमावण्याचा विचार केला.

कर्ज घेतले आणि पशुपालनाचा केला श्रीगणेशा आशुतोषने जवळपास वर्षभर नोकरीसाठी भटकंती केल्यानंतर ही नोकरी मिळाली नाही म्हणून पशुपालन करण्याचा विचार केला. या अनुषंगाने आशुतोषने कर्ज घेऊन राजस्थानच्या बिकानेर येथून चार साहिवाल जातीच्या गायी खरेदी केल्या आणि हा व्यवसाय सुरू केला.

उच्चशिक्षित आशुतोष लहानपणापासूनच हुशार शिवाय बीटेक पर्यंतच शिक्षणही घेतलेलं, त्यामुळे व्यवसायातील बारकावे शिकायला त्याला वेळ लागला नाही. चार गायींपासून सुरुवात केली आणि आज आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर हळूहळू व्यवसाय वाढवला.

आता आशुतोषला हा व्यवसाय सुरू करून तीन वर्षे झालेत आणि 3 वर्षात आज तो 70 गायींच्या गोठ्याचा मालक बनला आहे. आशुतोष सर्व गायींची चांगली काळजी घेतो आणि काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेले शेकडो लिटर गायीचे दूध शहराला पुरवतो. दुधाची कॉलिटी उत्तम असल्यामुळे आशुतोष यांनी उत्पादीत केलेल्या दूध व तुपाला चांगला भाव मिळत आहे.

दुधाच्या गुणवत्तेमुळे मागणी वाढली

आशुतोष सांगतात की इटावा जिल्ह्याच्या आसपासच्या भागात गायीची ही प्रजाती आढळत नाही. राजस्थान आणि हरियाणामध्ये साहिवाल गायी सर्वाधिक आहेत. एक गाय दररोज 10 ते 12 लिटर दूध देते.

जे काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक करून 50 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. तसेच कमी फॅटयुक्त दुधामुळे लोकांना त्यापासून कोलेस्ट्रॉल होत नाही. रक्तदाब पूर्णपणे नियंत्रित राहतो. यामुळे त्यांना एका महिन्यात एक लाखांहून अधिक नफा मिळतो.

वार्षिक 15 लाखांची कमाई सर्वसाधारणपणे आशुतोष यांनी उत्पादित केलेले देसी तूप बाजाराच्या तिप्पट दराने विकले जाते. आता त्यांचा व्यवसाय इतका वाढला आहे की सोशल मीडियावर तुपाच्या ऑर्डर्स येतात. दुधाचा दर्जा चांगला असल्याने जिल्हा अधिकारी देखील त्यांच्याकडून दुध आणि तूप खरेदी करत आहेत. ही निश्चितच एक कौतुकास्पद बाब आहे.

एवढेच नाही गाईच्या शेणापासून लाकूड आणि खत तयार करून ते चांगले उत्पन्न घेत आहेत. याशिवाय आशुतोषने परिसरातील लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. आशुतोषने एकूण 6 लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. या व्यवसायातून आशुतोष सुमारे 12 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमवीत आहे. निश्चितचं आशुतोष इतर नवयुवक तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts