Asus ROG Phone 6 India Launch: स्मार्टफोन निर्माता Asus कंपनीची फोन लॉन्च तारीख निश्चित झाली आहे. आणखी एक नवीन स्मार्टफोन ROG Phone 6 या महिन्यात 5 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे.
व्हर्च्युअल इव्हेंट Asus च्या अधिकृत YouTube चॅनेलवर आयोजित केला जाईल. Asus ROG Phone 6
ला Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC सह येणार आहे. तुम्ही ते फ्लिपकार्टवरून (Flipkart) खरेदी करू शकताव्हर्च्युअल इव्हेंटद्वारे, Asus भारतात ROG Phone 6 ला 5 जुलै रोजी IST संध्याकाळी 5:20 वाजता कंपनीच्या YouTube चॅनेलद्वारे लाइव स्ट्रीम करणार आहे. हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेबरोबरच भारतातही लॉन्च केला जाईल. Asus Snapdragon 8+ Gen 1 SoC सह ROG फोन 6 लाँच करत आहे. मात्र, या डिव्हाईसच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
Asus ROG फोन 6 कॅमेरा
ROG Phone 6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. यात फोटोग्राफीसाठी 64-मेगापिक्सलचा मुख्य रिअर सेन्सर आणि 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. टिपस्टर इव्हान ब्लास (@evleaks
मागील लीक्सनुसार, ते 18GB पर्यंत रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येऊ शकते. याशिवाय पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश केला जाऊ शकतो.