सध्या सत्तेतील लोकप्रतीनिधींनाच निधी दिला जातो..? ‘या’आमदाराची टीका

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- भारतीय जनता पार्टी सरकारच्या मागील पाच वर्षाच्या काळात मतदार संघात विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबत मुद्दा घेऊन टीका करण्याची संधी विरोधकांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विकासकामांचा निधी मिळाला नाही.

सत्तेतील लोक प्रतिनिधींनाच निधी दिला जातो आहे. विरोधातील लोक प्रतिनिधींना मिळणार निधी वळवला जात आहे. असा दुजाभाव होत आहे. विरोधक टीका करण्याचे काम करतात व्यासपीठ कोणते आहे याचेही भान त्यांना रहात नाही असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी नाव न घेता लगावला.

तालुक्यातील विविध विकासकामाचा शुभारंभ मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, कोरोनाचे संकट समोर आहे. कोरोनामुळे विकासाच्या कामावरही त्याचा परीणाम झाला आहे.

येणारा काळ निवडणुकीचा आहे. जनतेला आपले कोण ? संकटात कोण मदतीला येतो . विकासाच्या कामात कोण मदत करतो याची सर्व माहीती व जाणीवही असते. आपण आपले काम प्रमाणिक करीत रहायचे.

जनता जनार्धन असते. जनतेचा आशिर्वाद सतत आपल्या सर्वांच्या पाठीशी राहीलेला आहे तो कायम रहावा यासाठी काम करीत रहा असेही त्या म्हणाल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts