लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांचा लोकशाहीवरच हल्ला

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे. मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात असताना

 मात्र कोपरगाव येथे तालुकास्तरावर तहसील कार्यालयाचा वापर आमदारांचे पीए हे खासगी कार्यालयासारखा करत असल्याची बाब समोर आली, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला.

कोपरगाव तहसील कार्यालय निवडणूक शाखेत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना होत असताना सत्ताधारी आमदारांचे खासगी दूत अक्षरशः शासकीय कार्यालयाचे संगणक हाताळत मनमर्जी पद्धतीने गैरव्यवहार करत आहेत का? कोपरगावमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचे पाप सत्तेचा वापर करून सुरू आहे.

आपल्या मर्जीप्रमाणे गावे वेगवेगळ्या गटात घालण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून राजकीय सोयीचे सर्व काही दस्त बनवून घेतले जात आहेत.

एकीकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा असताना व तलाठ्याकडून वरती अशी माहितीची प्रतवारी करावी, असा संकेत असताना मुजोर सत्तेच्या बळाचा वापर कोपरगाव मतदारसंघात घातला जात आहे.

ज्या प्रमाणे माहितीचा अधिकार वापरून सत्य समोर आणणाऱ्या किरीट सोमय्या यांना त्रास देऊन प्रकरणे दडपण्यासाठी सरकार बळ वापरत आहे. त्याच प्रकारे कोपरगावमध्येही वेगळे चित्र नाही.

त्वरित या संदर्भात कार्यवाही व्हावी व सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांना शासन व्हावे. आमदार काळे यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत झालेली धूळधाण त्यांना बोचत असल्याने व आगामी काळात होणाऱ्या पराभवाची चाहुल लागल्याने त्यांची पायाखालची जमीन सरकल्याने हा खटाटोप सुरू आहे, असेही रोहोम म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts