ताज्या बातम्या

मला ३०२ कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न, तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं; बार्शीच्या आमदार पुत्राचे फडणवीसांना पत्र

बार्शी : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा मुलगा रणवीर याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मागणी केली आहे. त्यामध्ये त्याने स्वतःच्या बचावासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी विनंती केली आहे.

माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांचे समर्थक भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याला धमकावले असल्याचा आरोप रणवीर राऊतने केला आहे.

फेसबुक लाईव्हद्वारे पुण्यातील गँगवॉर, मुंबईतील गँगवॉरमार्फत तुम्हाला संपवू अशा वारंवार धमक्या आंधळकर यांनी दिल्या. याचे सर्व पुरावे आम्ही पेनड्राईव्हद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस निरीक्षक कार्यालय यांना वारंवार पत्र व्यवहार करतोय.

परंतु जीवाला धोका असल्यामुळे वारंवार मी पैसे भरुन पोलीस संरक्षण (Police protection) देण्याची मागणी वर्षभरापासून करत असून आपल्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जात नसल्याचे रणवीर राऊतने सांगितले आहे.

बार्शीतील माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहे आंधळकर तसेच काही आरटीआय कार्यकर्ते बार्शीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचबरोबर हे सर्वजण षडयंत्र रचून माझ्यावर हल्ला करून, मलाच ३०२ किंवा ३०७ सारख्या कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी रणवीरने केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेन असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. तसेच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीरला फसवण्यात येत असल्याचा आरोपही फडणवीसांनी याआधी केला आहे.

Renuka Pawar

Recent Posts