अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-भिंगारमधील नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका युवकावर चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे आला आहे.
यामध्ये अभिषेक मच्छिंद्र बनसोडे (वय 23 रा. गोटी चौक, नागरदेवळे) हा युवक जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिषेक बनसोडे नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या समोरील आरोग्य केंद्राच्या पाठीमागे लघुशंककेसाठी जात असताना आरोपी त्याठिकाणी आले.
त्यांनी ग्रामपंचयात समोर अभिषेकला गाठून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. स्वप्नील पाखरे याने त्याच्याकडील चाकूने अभिषेकवर हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी अभिषेकने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी महेश गौतम पाखरे, अतुल गौतम पाखरे, स्वप्नील ऊर्फ सोप्या पाखरे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. नागरदेवळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.