ताज्या बातम्या

Infinix Hot 12 : मस्तच! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा Infinix चा शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

Infinix Hot 12 : जर तुम्ही कमी बजेटमध्ये शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्टवर सध्या Infinix Hot 12 या स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे.

या स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये इतकी आहे परंतु, तो आता तुम्ही 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. तसेच हा फोन 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. काय आहे ऑफर जाणून घ्या.

जाणून घ्या ऑफर

Infinix Hot 12 या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे, परंतु हा फोन फ्लिपकार्टवर 34 टक्के सवलतीसह 8,499 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या फोनसोबत फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 5% कॅशबॅक आणि 7,900 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध असणार आहे.

तुम्ही आता जुन्या फोन एक्सचेंज करून जास्तीत जास्त बचत करू शकता. कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरसह या फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्यात येणार आहे. फोन एक्सचेंज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरचे मूल्य तुमच्या जुन्या फोनच्या आणि कंपनीच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

अशी असणार फीचर्स आणि कॅमेरा

Infinix Hot 12 या स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा HD Plus LCD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. तसेच या फोनमध्ये Octa Core MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज आहे. एवढेच नाही तर मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. फोनमध्ये Android 11 आधारित XOS 10 आहे.

या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप त्याच्यासोबत उपलब्ध आहे, जो 50 मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स, 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि एआय सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या मागील बाजूस क्वाड तसेच पुढील बाजूस ड्युअल एलईडी फ्लॅशचा सपोर्ट आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल VoLTE, OTG ब्लूटूथ, वाय-फाय, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट आहे. परंतु, हे लक्षात घ्या की या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts