ताज्या बातम्या

अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, आमचा दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय; संजय राऊत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसे व शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद अधिक चिघळताना दिसून येत आहे, कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असून मनसेकडून (Mns) मात्र तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अयोध्या दौरा हा आधीच ठरला असून अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नसून ती आमची पायवाट आहे, असे स्पष्ट केले आहे.

राऊत म्हणाले, अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या हे नातं आहे. त्यामुळे आम्हाला तयारी करण्याची गरज नाही.

आम्ही अयोध्येत जात असतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि नंतरही. स्वत: आदित्य ठाकरेही जाऊन आले. मधल्या काळात कोरोनामुळे (Corona) आम्हाला जाता आलं नाही. आमचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय. चार पाच दिवसांत तारीख ठरवू, असेही राऊतांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मात्र मीडियाशी संवाद साधताना अयोध्येचा दौरा हा कोणताही इव्हेंट (Event) नसून या दौऱ्यातून आम्ही रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच नांदगावकर यांनी येत्या ५ जूनला अयोध्येला जाणार आहोत. त्याचं प्लानिंग सुरू आहे. कसं जाणार? कधी जाणार याची यावेळी चर्चा करण्यात आली असून त्याबाबत सूचना केल्या असल्याचे सांगितले आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts