Ayushman Bharat Yojana : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन (Ayushman Bharat Mission) अंतर्गत 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते.
ही योजना संपूर्ण देशभरात चालवली जात आहे. याद्वारे लाभार्थी हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.
अशा प्रकारे तुम्हाला 500000 रुपये नफा मिळतो
‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत सरकारकडून (Central Govt) तुम्हाला मोफत उपचाराची (Free treatment) सुविधा दिली जाते.
या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना आयुष्मान गोल्डन कार्ड (Ayushmann Golden Card) जारी केले जाते, ज्यावर त्यांना 500000 रुपयांचा मोफत विमा (Insurance) मिळतो. या योजनेत लाभार्थी त्यांचे गोल्डन कार्ड बनवून देशातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात.
याशिवाय सरकारने लोकांच्या सोयीसाठी एक टोल फ्री क्रमांकही (Toll free number) जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या दूर करू शकता.
आयुष्मान भारत टोल फ्री क्रमांक 14555
तुम्ही हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याशिवाय, तुम्ही pmjay@nha.gov.in या अधिकृत मेल आयडीवरही मेल करू शकता.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत एकूण 17 कोटी 35 लाख 71 हजार 234 आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत.