Ayushman Card : तुम्हाला आयुष्मान कार्डबद्दल नक्कीच माहिती असेलच. याच कार्डमुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेता येतो. परंतु, जर तुम्ही अजूनही कार्ड बनवले नसेल तर काळजी करू नका.
कारण तुम्ही ते अजूनही बनवू शकता. आयुष्मान कार्डमुळे तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतो. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर. आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान कार्ड बनवण्याचा वेग वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
मिळतो हा फायदा
आयुष्मान कार्ड हे पात्रांसाठी बनवले जात असून जर कार्डधारकाला गरज भासली तर त्यांना रूग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येतात.
असा घ्या फायदा
क्रमांक 1
जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल तर तुम्ही उपचार मोफत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला प्रथम रुग्णालयात जाऊन ते रुग्णालय आयुष्मान योजनेत नोंदणीकृत आहे की नाही ते शोधावे लागेल.
क्रमांक 2
जर ते रुग्णालय योजनेत नोंदणीकृत नसेल तर आयुष्मान योजनेत नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयात जावे लागेल. तुम्ही त्या रुग्णालयाची यादी देखील तपासू शकता. त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमधील आयुष्मान मित्र या हेल्प डेस्कवर जावे लागेल.
क्रमांक 3
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमची पात्रता आणि कागदपत्रे तपासली जातील. जर पडताळणी बरोबर आढळली, तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेता येईल.