ताज्या बातम्या

Bajaj New Electric Scooter : शानदार लूक आणि 108 किमीची रेंज देणारी बजाजची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर पाहिलीत का? किंमत आहे फक्त..

Bajaj New Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बजाजने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये कंपनी 108 किमीची रेंज देत आहे.

इतकंच नाही तर कंपनीची ही स्कुटर तुम्ही शानदार लूकसह खरेदी करू शकता. कंपनीने यात जबरदस्त रेंज दिली असल्याने बजाजची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धुमाकूळ घालत आहे. कमी किमतीत तुम्ही ही स्कुटर खरेदी करू शकता.

बजाजची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव बजाज चेतक आहे. हे भारतीय बाजारात दोन प्रकारात येते. यातील एक बजाज चेतक प्रीमियम तर दुसरा बजाज चेतक प्रीमियम 2023 आहे. जाणून घ्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत.

जाणून घ्या किंमत ?

बजाज चेतक प्रीमियम – रु 1,22,453 (एक्स-शोरूम)
बजाज चेतक प्रीमियम 2023 – रु 1,51,958 (एक्स-शोरूम)

जाणून घ्या फीचर्स

बजाज चेतकवर आढळणारे हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर हे एलईडी युनिट्स दिले आहे, तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे पूर्णपणे डिजिटल कलर एलसीडी युनिट असून यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसोबतच इतर अनेक भन्नाट फीचर्स दिली आहेत, जे ग्राहकांना आकर्षित करतात.

मिळणार 108 किमी रेंज

कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला पॉवर देण्यासाठी कंपनीकडून ब्रशलेस डीसी मोटर्स बसवण्यात आल्याआहेत ज्या 4.08kW ची पीक पॉवर तसेच 16Nm कमाल टॉर्क जनरेट करतात. 60.3Ah लिथियम-आयन बॅटरीने सुसज्ज असणारी ही स्कूटर ‘इको’ मोडमध्ये 108 किमी अंतर कापू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

तसेच ही स्कूटर वेग आणि लूकच्या बाबतीत खूप मजबूत आहे. तिचा कमाल वेग 63 किमी प्रतितास असून तरुणांसाठी ही एक उत्तम स्कूटर ठरेल. 5A पॉवर सॉकेटसह या स्कुटरची बॅटरी पाच तासांत पूर्ण चार्ज होईल. तर, नवीन स्कूटरच्या पुढील बाजूस सिंगल-साइड सस्पेंशन आणि मागील बाजूस मोनोशॉक दिला आहे.

याच्या समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम युनिट देण्यात आले आहे. कंपनी तिच्या बॅटरीवर तीन वर्षे/50,000 किमीची वॉरंटी दिली आहे. या स्कुटरची बॅटरी लाइफ सुमारे 70,000 किमी टिकू शकते असा दावा कंपनी करत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts