Bajaj Platina : कोणतीही बाईक खरेदी करायची असेल तर त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशातच जर तुम्हाला कमी किमतीत बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण तुम्ही आता Bajaj Platina मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. तुम्ही आता काही ऑनलाईन वेबसाइटवरून अवघ्या 20 हजार रुपयांना ही बाईक खरेदी करू शकता.
जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असल्यास तुम्हाला 63,130 रुपये ते 76,978 रुपये खर्च करावे लागू शकतात. मात्र जर तुमचे बजेट जास्त नसेल आणि तुम्हाला त्याचे जुने मॉडेल ऑनलाइन खरेदी करता येईल. सध्या अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स असून तुम्ही या ठिकाणाहून वापरलेली वाहने अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता.
1. OLX
OLX या वेबसाइटवर बजाज प्लॅटिना बाइकच्या 2015 मॉडेलवर शानदार डील ऑफर करत आहे. या बाईकची अतिशय उत्तम देखभाल केली असून ती खूप कमी चालवण्यात आली आहे. तिची नोंदणी दिल्लीची आहे आणि तुम्ही ही बाइक याठिकाणाहून 20,000 रुपयात खरेदी करू शकता.
2. DROOM
DROOM या वेबसाइटवर बजाज प्लॅटिना बाइकच्या 2016 मॉडेलवर शानदार ऑफर मिळत आहे. या बाईकची उत्तम देखभाल करण्यात आली आहे, तिची नोंदणी दिल्लीची असून तुम्ही कंपनीची ही सर्वोत्तम मायलेज देणारी बाइक अवघ्या 22,000 रुपयात खरेदी करू शकता.
3. QUIKR
QUIKR या वेबसाइटवर बजाज प्लॅटिना बाईकच्या 2017 मॉडेलवर शानदार सवलत मिळत आहे. या बाईकची उत्तम देखभाल करण्यात आली आहे, तिची नोंदणी दिल्लीची असून तुम्ही कंपनीची ही बाइक.25,000 रुपयांना खरेदी करू शकता.