ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्या भगिनीचे पुण्यात निधन

Maharashtra news: प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी संजिवनी करंदीकर (वय ८४) यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या आत्या होत.उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी करंदीकर यांनी प्रयत्न केले होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी जाहीरपणे ही मागणीही केली होती.

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता.

रिझर्व बॅंके ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts