अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांसोबत एकत्र लढवेल, अशी भूमिका महसूलमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली.
यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे वारंवार जाहीर केले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी थोरात शनिवारी शेवगावात होते.
या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीतील सहभागी पक्ष एकत्रित लढतील.