Balasaheb Thorat : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आहे. यामुळे आता ते पक्ष सोडणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
असे असताना थोरात कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आहेत. यामुळे त्यांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी थोरात हे सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुढील आठवड्यात ही सभा होईल. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल, असे सांगितले जात आहे. यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, ते पक्षीय पातळीवरचे आहेत.
दरम्यान, यामुळे या निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी थोरात यांनी ही भूमिका घेतली असावी, असे सांगितले जात आहे. मात्र पुढील राजकीय भूमिका काय असणार हे कधी जाहीर करणार याकडे देखील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस हा आपला विचार आहे, तो पुढे घेऊन जायचा आहे. काही राजकारण झाले असले तरी त्या संदर्भात पक्षीय व्यासपीठावर भूमिका मांडली जाईल, मी पक्षाच्या पातळीवर भूमिका मांडणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, त्यांची पुण्यात सभा होणार असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यांनी अनेक पदांकर काम केले आहे. राज्यभरात त्यांचा जनसंपर्क आहे. याचा पक्षाला फायदाच होईल.