अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :-गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडत चालला आहे. कधी अवकाळी,कधी गारपीट,कधी अतिवृष्टी,तर कधी ढगाळ वातावरण या नैसर्गिक संकटासमवेतच बळीराजा (Farmer) शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.
एकंदरीत अस्मानी (Climate Change) आणि सुलतानी संकटांचा सामना करत बळीराजा आपला उदरनिर्वाह भागवत आहेशेतकऱ्यांच्या पुढ्यात कितीही नैसर्गिक तसेच सुलतानी संकटे आली तरीदेखील बळीराजा खचून जात नाही. शेतकरी राजा संकटांवर मात करत पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतो आणि यशाचे शिखर गाठण्यासाठी धडपडत असतो.
एका पिकातून नुकसान झाले सर शेतकरी बांधव दुसऱ्या पिकाच्या लागवडीकडे वळतात. नुकसान झाल्यानंतरही पिकाची लागवड करण्याचे धाडस केल्यास काय होऊ शकते हे या हंगामात कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कलिंगड (Watermelon) या हंगामी पिकाची (Seasonal crop) मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव लागवड करत असतात.
मात्र गेल्या दोन वर्षे कोरोणाच्या काळात कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Watermelon Growers) मोठा तोटा सहन करावा लागला होता. कोरोना मुळे लॉकडाऊन असल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना कलिंगड विक्री करण्यास मोठे अडथळे आले होते त्यावेळी खरेदीदार कलिंगडाची खरेदी करत नव्हते थोड्याफार प्रमाणात कलिंगड विक्री होतं होता तोही अतिशय कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विक्री करावा लागला होता.
यामुळे कलिंगड उत्पादक शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. दोन वर्षा सारखी परिस्थिती याहीवर्षी उदभवू नये यामुळे शेतकरी बांधवांनी या हंगामात कलिंगड लागवडीकडे पाठ फिरवली. कलिंगड लागवड कमी झाल्यामुळे कलिंगडाचे उत्पादन यावर्षी कमी झाले आहे
शिवाय यंदा बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. एवढेच नाही तर यंदा तापमानात मोठी वाढ झाली आहे म्हणून कलिंगडची मागणीदेखील अपेक्षेपेक्षा अधिक आहे.
यामुळे कलिंगड च्या वाढत्या मागणीचा आणि उत्पादनात घट झाल्यामुळे कलिंगड ला चांगला दर मिळत आहे. याचा सरळ फायदा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना होताना बघायला मिळत आहे.
कलिंगड ची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्याने कलिंगड खरेदी करणारे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कलिंगडची खरेदी करू लागले आहेत.
सध्या बांधावर येऊन व्यापारी कलिंगडला 12 ते 14 रुपये प्रति किलो असा दर देत आहेत. यामुळे यंदा ज्या शेतकर्यांनी दोन वर्षाचा तोटा सहन करूनही कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला आहे त्या शेतकऱ्यांची नक्कीच चांदी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मौजे काले येथील रहिवासी शेतकरी संदीप थोरात यांनी देखील दोन वर्षांचा तोटा नजरेआड करत मोठ्या हिमतीने कलिंगडची लागवड केली.
संदीप यांनी एक एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड केली आणि अवघ्या साठ दिवसात संदीप यांना कलिंगड पिकातून चांगले उत्पादन मिळाले. संदीप यांच्या मते 60 दिवसात 25 टन कलिंगड उत्पादन त्यांना मिळणार आहे.
यामुळे संदीप यांना एकरी लाखोंचा नफा मिळणार आहे. साहजिकच दोन वर्षाची भरपाई यातून निघणे अशक्य आहे मात्र यामुळे संदीप यांनी समाधान व्यक्त केले आहे.