Bank Account : एक चूक पडेल महागात! कायमचे बंद होईल तुमचे बँक खाते, कसे ते जाणून घ्या

Bank Account : लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच बँकेत खाते असते. कोणताही व्यवहार करायचा असेल तर बँक खाते खूप महत्त्वाचे आहे. बँक खातेच नसेल तर तुम्हाला कोणता व्यवहार करता येणार नाही. तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. कसे ते जाणून घ्या.

बंद होईल तुमचे बँक खाते

अनेकदा बँक खात्यात दीर्घकाळ कोणताही व्यवहार झाला नाही तर बँक खाते बंदही होऊ शकते. 2 वर्षात कोणत्याही बचत खात्यात किंवा चालू खात्यात कोणताही व्यवहार झाला नसल्यास बँक खाते निष्क्रिय केले जाते. सध्याच्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, समजा बचत खाते किंवा चालू खात्यामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार होत नसल्यास बँक खाते निष्क्रिय समजले जाते आणि त्यासाठी स्वतंत्र खातेही ठेवले जाते.

हे काम अजिबात करू शकणार नाही

तसेच कोणतेही खाते निष्क्रिय झाले तर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. यावेळी लोकांना त्यांच्या बँक खात्यात लॉग इन करता येणार नाही. तसेच तुम्हाला एकत्र कोणतेही पेमेंट करता येणार नाही. तुम्ही कोणतेही व्यवहारही करू शकणार नाही.

जर कोणतेही बँक खाते निष्क्रिय झाल्यास त्या बँक खात्याशी संबंधित सर्व क्रेडिट आणि डेबिट व्यवहार ब्लॉक करतात. सध्या लोकांना UPI, NEFT, RTGS इत्यादी वापरण्याची परवानगी देण्यात येत नाही. इतकेच नाही तर चेकबुक किंवा डेबिट कार्डद्वारे होणारे व्यवहारही ब्लॉक केले जातात.

असे करा सक्रिय

हे लक्षात घ्या की कोणतेही बचत खाते असो वा नसो, त्या बचत खात्यांत व्याज नक्कीच देण्यात येते, असे आरबीआयचे मत आहे. परंतु निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करता येते. त्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असावी लागतात. हे खाते चालू करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागणार आहे. तुमचे खाते असणाऱ्या शाखेत जाऊन स्वत:ची ओळख देऊन तुम्हाला तुमचे खाते सक्रिय करता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts