Bank FD : देशात अनेक बँका आहेत. तुम्ही कोणत्याही जास्त व्याज देणाऱ्या बँकेत गुंतवणूक करू शकता. प्रत्येक बँकेची सेवा आणि सुविधा वेगळ्या असतात. अशा काही बँका आहेत ज्या आपल्या FD गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज देतात.
तुमच्यासाठी मिड टर्म एफडी खूप फायदेशीर ठरतील. कारण यात गुंतवणूक जास्त काळ लॉक नसते. यावर व्याज चांगले असते. या आहेत 2 ते 3 वर्षांच्या मिड टर्म एफडीवर भरघोस दर देणार्या 5 बँका. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
HDFC बँक FD व्याज दर
HDFC बँक विवीध कालावधीच्या FD साठी 3 ते 7.20 टक्के दराने व्याज देते. हे व्याजदर 2 कोटी रुपयांच्या FD वर लागू होतात. 15 ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.15 टक्के व्याज मिळते. समजा तुम्ही वृद्ध असाल तर तुम्हाला 7.65 टक्के दराने व्याज मिळेल.
SBI FD व्याज दर
स्टेट बँक ऑफ इंडिया विविध कालावधीसाठी FD वर 3 ते 7 टक्के व्याज देत असून हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर मिळतात. तसेच 2 ते 3 वर्षांच्या FD वर बँकेकडून सर्वात जास्त 7 टक्के व्याज दिले जाते. अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणूकदारांना ७.१० टक्के दराने व्याज दिले जाते.
ICICI बँक FD व्याज दर
समजा तुम्ही ICICI बँकेत गुंतवणूक केली तर तुम्हाला FD वर 3 ते 7.10 टक्के व्याज मिळेल. हे व्याज दोन कोटी रुपयांच्या एफडीवर असून ग्राहकांना बँक 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.10 टक्के दर देते. तसेच वृद्धांना या कालावधीत 7.60 टक्के दराने व्याज मिळते.
कॅनरा बँक एफडी व्याज
कॅनरा बँकेला 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या एफडीवर 4 ते 7.25 टक्के दराने व्याज मिळत आहे. 7.25 हे बँकेकडून सर्वात जास्त व्याज आहे. हा व्याजदर ४४४ दिवसांच्या एफडीवर दिला जातो. जर तुम्हाला बँकेची एफडी अधिक योग्य वाटल्यास तुम्ही तिथे एफडी करू शकता.
PNB FD वर व्याज
PNB देखील आपल्या FD वर 3.50% ते 7.25% पर्यंत व्याज देते. हे व्याज 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर देण्यात येते. PNB 444 दिवसांच्या FD वर 7.25 टक्के व्याज देते.