Bank FD : सध्या अनेक बँका आहेत. यात सरकारी तसेच खाजगी बँकांचा समावेश आहे. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. अनेक ग्राहक बँक FD मध्ये गुंतवणूक करतात.
महत्त्वाचे म्हणजे आता युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या FD वर मिळणाऱ्या व्याजदरात बदल केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळेल. या नवीन दरांनुसार ज्येष्ठ ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.
जाणून घ्या युनिटी बँकेचे व्याजदर
युनिटी बँक आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या परिपक्वतेवर आपल्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी 4.50 ते 9 टक्के आणि ज्येष्ठ ग्राहकांसाठी 4.50 ते 9.5 टक्के दराने व्याज देत आहे. तसेच युनिटी बँक ज्येष्ठ ग्राहकांना एकूण 1001 दिवसांसाठी 9.50 टक्के दराने वार्षिक व्याज देखील उपलब्ध करून देत आहे.
सामान्य ग्राहकांना 9 टक्के दराने व्याज देत आहे. यानंतर 181 दिवस ते 201 दिवस आणि 501 दिवस या कालावधीसाठी ज्येष्ठ ग्राहकांना 9.25 टक्के आणि सामान्य ग्राहकांना 8.75 टक्के व्याज दिले जात आहे.
तर आकारला जातो दंड
हे लक्षात घ्या की, युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर आधारित, मुदत ठेवी आणि आरडी ठेवींच्या मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी काही शुल्क आकारण्यात येते. तसेच बँकेत ठेव ठेवल्यावर, त्याच कालावधीसाठी लागू असणाऱ्या दरावर किंवा यापैकी जे कमी असेल त्यावर 1 टक्के दंड देखील ग्राहकांकडून आकारण्यात येतो. अलीकडे अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात खूप सुधारणा केली आहे. ज्यामुळे बँकांच्या ग्राहकांना आर्थिक फायदा होत आहे.
लक्षात ठेवा या गोष्टी
जर तुम्ही एखाद्या बँकेत गुंतवणूक करत असाल तर त्यापूर्वी त्या बँकेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.