Bank Holiday in May : बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. अशीच सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यासाठी जाहीर केली आहे.
जर तुमचे बँकेत किंवा बँकेशी निगडित कोणतेही काम असेल तर ते आजच पूर्ण करा. कारण पुढच्या महिन्यात बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. जर तुम्ही पुढच्या महिन्यात बँकेत जाणार असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी पाहून बँकेत जा. नाहीतर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल.
सुट्टीच्या दिवशी बँका बंद असल्याने तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण होणार नाहीत. ग्राहकांनी त्यांचे काम अगोदर पूर्ण करावे. पहा सुट्ट्यांची यादी. पुढच्या महिन्यात शनिवार आणि रविवारसह सण, वर्धापन दिन आणि इतर प्रसंग असल्याने बँका एकूण 12 दिवस बंद राहतील. तसेच हे लक्षात घ्या की बँकेच्या सुट्ट्यांची यादी राज्यानुसार बदलत असते.
पहा सुट्ट्यांची यादी
1 मे 2023: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि त्रिवेंद्रम येथे महाराष्ट्र दिन/मे दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत.
5 मे 2023: बुद्ध पौर्णिमेमुळे आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद राहणार आहेत.
7 मे 2023: रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
13 मे 2023: देशभरात दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
14 मे 2023: रविवारमुळे बँका बंद राहणार आहेत.
16 मे 2023: सिक्कीममध्ये स्थापना दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत.
21 मे 2023: रविवार आहे त्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
22 मे 2023: महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहणार आहेत.
24 मे 2023: काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहणार आहेत.
27 मे 2023: चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहणार आहेत.
28 मे 2023: रविवारमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.
दरम्यान सुट्टीच्या दिवशी बँका बंद असतात त्यामुळे अनेकांची अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. परंतु तुम्ही तुमचे काही काम मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता. तुम्ही आता नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येते.
तसेच, तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी UPI चा वापर करू शकता. तसेच पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता. या डिजिटल बँकिंग सुविधांचा लाभ घेऊन तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांमध्येही तुमचे बँकेचे काम सुरळीतपणे सुरू ठेवू शकता.