Bank Holiday In November : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. जर तुम्ही या काळात बँकेत जाणार असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. तुमचे बँकेतील महत्त्वाचे काम आजच लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण पुढच्या महिन्यात सणांमुळे बँका 15 दिवस बंद राहणार आहेत.
बँका बंद असल्याने तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकणार नाही. तुमचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान RBI प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
नोव्हेंबर 1 (बुधवार): कन्नड राज्योत्सव/करवा चौथ – कर्नाटक, मणिपूर, हिमाचल प्रदेशमध्ये बँक बंद राहणार आहेत.
5 नोव्हेंबर – रविवार असल्याने बँक बंद राहणार आहेत.
10 नोव्हेंबर (शुक्रवार): वांगाळा महोत्सव – मेघालयमध्ये बँक बंद राहणार आहेत.
11 नोव्हेंबर – दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहेत.
12 नोव्हेंबर (रविवार) : दिवाळीनिमित्त बँका बंद राहतील.
१३ नोव्हेंबर (सोमवार): गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा (दीपावली)/दिवाळी – सिक्कीम, मणिपूर, त्रिपुरा, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँक बंद राहणार आहेत.
14 नोव्हेंबर (मंगळवार): दिवाळी (बळी प्रतिपदा)/दीपावली/विक्रम सावंत नवीन वर्षाचा दिवस/लक्ष्मी पूजा – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
15 नोव्हेंबर (बुधवार): भाईदूज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा (दिवाळी) / निंगोल चक्कौबा / भ्रातृद्वितिया – सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद असतील.
19 नोव्हेंबर – रविवार असल्याने बँका बंद असतील.
20 नोव्हेंबर (सोमवार): छठ (सकाळी अर्घ्य) – बिहारमध्ये बँका बंद असतील.
२३ नोव्हेंबर (मंगळवार): सेंग कुत्स्नेम/इगास-बागवाल – उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
25 नोव्हेंबर – चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
26 नोव्हेंबर – रविवार असल्याने बँका बंद असतील.
27 नोव्हेंबर (सोमवार): गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमा/रस पौर्णिमा – बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली येथे बँका बंद असतील.
30 नोव्हेंबर (गुरुवार): कनकदास जयंती – कर्नाटकमध्ये बँका बंद असतील.