Bank Holidays : मे महिना संपण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर जून महिना (June Month) सुरु होणार आहे. या महिन्यांमध्ये जर बँकेची कामे (Bank works) असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या महिन्यात बँकांना ८ दिवस सुट्ट्या (Bank closed for 8 days) आहेत. त्यामुळे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत.
या बँक सुट्ट्यांमध्ये 6 दिवसांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, इतर प्रादेशिक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर (Reserve Bank website) मिळालेल्या माहितीनुसार, बँक फक्त जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 2 जून रोजी बंद राहील.
बँका कधी बंद होतील
२ जून – महाराणा प्रताप जयंती
5 जून – रविवार
11 जून – दुसरा शनिवार
12 जून – रविवार
15 जून – गुरु हरबोबिंद जयंती, राजा संक्रांती, YMA (मिझोराम, भुवनेश्वर, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद)
19 जून – रविवार
25 जून – चौथा शनिवार
26 जून – रविवार
इतर माहिती
ज्या दिवशी बँका बंद असतील त्या दिवशीही बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करता येते. प्रत्यक्षात बँकांच्या सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवा वर्षभर चालते.
याद्वारे तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित सर्व कामांचा निपटारा करू शकता. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी फक्त बँक शाखा बंद असतात, तर एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटिंग मशीन, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू असते.