Bank Loan : सध्या कोणाला कधी पैशांची गरज पडेल हे सांगता येत नाही. अनेकदा प्रत्येकाकडे पैसे असतातच असे नाही. काहीजण पैसे नसल्यास मित्रांकडून किंवा कंपनीकडून पैसे उधार घेत असतात. परंतु काहीवेळा अनेकांची फसवणूक होते.
तर काहीजण बँकेकडून कर्ज घेत असतात. मात्र बँक कर्ज घेण्यासाठी प्रोसेसिंग फी आकारत असते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता ही बँक कर्ज घेण्यासाठी प्रोसेसिंग फी घेणार नाही.
सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्राकडून आता घर आणि कर्जावरील व्याजदरात एकूण 0.20 टक्क्यांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. तसेच या बँकेकडून प्रक्रिया शुल्कही माफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आता या कपातीमुळे, गृहकर्ज सध्याच्या 8.60 टक्क्यांऐवजी आता 8.50 टक्के दराने दिला जाणार आहे. तर दुसरीकडे, कार कर्ज 0.20 टक्क्यांनी कमी करून 8.70 टक्क्यांवर आलेले आहे.
या दिवसापासून लागू होणार नवीन व्याजदर
याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रने एका निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, नवीन जाहीर केलेले दर 14 ऑगस्टपासून लागू केले जाणार आहेत. कमी व्याजदराचा दुहेरी फायदा आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्याने ग्राहकांचा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल. अशा स्थितीत आता ग्राहकदेखील बँकेकडून कर्ज घेण्यास आकर्षित होतील. मागील 1 वर्षात, बीओएमच्या शेअरच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
किती आहे शेअरची किंमत
हे लक्षात घ्या की 11 ऑगस्ट रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची किंमत NSI वर 37.65 रुपयांवर बंद झाली. तर बँकेच्या स्टॉकचा NSI PP वर 52 आठवड्यांचा उच्चांक 38.80 रुपये इतका आहे. 1 वर्षाचा नीचांक 16.90 रुपये आहे. तर 11 ऑगस्ट रोजीच या समभागाने त्याच्या एका वर्षाच्या उच्चांकाला स्पर्श केला आहे.