Bank Rule : सावधान! ‘या’ बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढले तर आकारले जाणार शुल्क, जाणून घ्या कारण

Bank Rule : तुमचे देखील या लोकप्रिय बँकांमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. याबाबत आरबीआयकडून बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

हे लक्षात घ्या की प्रत्येक पैसे काढण्यावर शुल्क भरावे लागणार आहे. आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका ग्राहकाकडून जास्तीत जास्त 21 रुपये आकारतात. त्यामुळे कोणती बँक किती शुल्क आकारत आहे आणि त्यासाठी किती मर्यादा मोफत ठेवली आहे ते जाणून घेऊया सविस्तरपणे.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर प्रत्येक महिन्याला 5 मोफत व्यवहार उपलब्ध करून देत आहेत. मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर, प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये तसेच एटीएममधील प्रत्येक आर्थिक व्यवहारावर 21 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

एसबीआय बँक

एसबीआय बँक त्यांच्या एटीएममध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त खात्यातील शिल्लकीवर 5 विनामूल्य व्यवहार ऑफर करत आहे. या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले तर 10 रुपये आकारावे लागणार आहेत. इतर बँकांचे एटीएम कार्ड वापरून एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 20 रुपये अधिक जीएसटी आकारला जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक पाच व्यवहारांनंतर शुल्क आकारत असून यानंतर, ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी 10 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. PNB इतर बँकांच्या एटीएममध्ये मेट्रो शहरांमध्ये तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहारांचा पर्याय उपलब्ध करून देत आहे. यानंतर ग्राहकांना पैसे काढण्यासाठी २१ रुपये आणि जीएसटी आणि इतर व्यवहारांसाठी ९ रुपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे.

ICICI बँक

ICICI बँक त्यांच्या ATM धारकांना प्रत्येक महिन्याला 3 मोफत व्यवहार देत आहे. या मोफत व्यवहाराची मर्यादा गाठल्यानंतर, ICICI बँक आपल्या ग्राहकांकडून प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये आणि प्रत्येक आर्थिक व्यवहारावर 21 रुपये आकारत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts