अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भगवानगड पाणी योजनेचा विषय तुम्ही आता बोलायला लागले. परंतु या योजनेतील पस्तीस गावांची नावे तरी माहीती आहेत का तुम्हाला ? पालकमंत्र्यांना तालुक्याबद्दल चुकीची माहीती देवुन त्यांचे मत दूषीत करण्याचा उद्योग येथील काहीजण करीत आहेत.
शिवसेनाचा राज्यात मुख्यमंत्री असताना शिवसेनाच्या तालुकाध्यक्षाला बैठकीला येवु देत नाहीत. पालकमंत्र्यांच्या बैठकीला पोलिस छावणीचे स्वरुप का आणले. कोणतेही आरोप करताना भान ठेवा,अन पालिकेला बदनाम करण्याचे थांबवा असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना दिला.
येथील पाण्याच्या टाकीच्या कामाचा व रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आ.राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. रामगिरीबाबा टेकडीवर एकोणावीस लाख लिटर पाणीसाठ्याची क्षमतेची टाकी बांधण्यात येणार असून शहराला रोज पाणी देता येईल अशी व्यवस्था करण्याचे काम करण्यात येणार आहे.
नाथनगरमधे पंचेचाळीस लाख रुपयाचा रस्ताकाँक्रीटीकरणाचे काम करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी निधी मिळविला जाईल असे राजळे म्हणाल्या. तर कसबा पेठेत पत्र्याचे छत उभारले व स्लँबचे बिल काढल्याचा आरोप पालिकेवर झाला.
पुरावा दाखवा आम्हीजर काही वाईट केले असेल तर चौदाजण राजीनामे देवु. तुमच्या सारखे पालिकेच्या खुल्या जागा बळकविण्यासाठी आम्हाला सत्ता नको आहे. उगाच लोकांना संभ्रमित करण्याचे काम करु नका असा इशारा नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांनी दिला.