ताज्या बातम्या

सावधान! रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; नाहीतर स्वतःच्या चुकीला स्वतः जबाबदार असाल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- प्रत्येक व्यक्ती दररोज नियमितपणे कामे करत असतो. पूर्ण दिवसात काम, टेंशन, डिप्रेशन किंवा इतर अडीअडचणी येत असतात. याचा थेट परिणाम आपल्या झोपेवरती होत असतो.

अलीकडे झोपेच्या त्रासाला अनेक जण कंटाळले आहेत. या वेगवान जीवनात खूप जण शरीराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे.

स्वतःला लावलेल्या वाईट सवय आपण हळूहळू कमी केल्या पाहिजेत.

याचा परिणाम कालांतराने दिसायला लागतो. खराब झोपेमुळे तब्येत बिघडायला वेळ लागत नाही.आपल्या वाईट सवयी आपल्याला झोपू देत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शरीरामध्ये सतत झोपेचे वारे फिरत असतात. तर जाणून घ्या कोणकोणत्या वाईट सवयी आपण बदलल्या पाहिजेत.

झोपण्याआधी चहा किंवा कॉफी पिणं हे शरीरासाठी चांगले नसून याने झोप नाहीशी होते. झोपण्याची वेळ फिक्स नसल्याने आपली दररोजची झोपण्याची वेळ वेगळी असते. यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो.

रात्री झोपण्यापूर्वी भूक लागणे, परंतु झोपण्याआधी नाष्टा केल्याने पोट फुगणे, गॅस होणे, व अपचन होऊन त्याचा झोपेवर परिणाम होतो. रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय खूप वाईट आहे.

त्यामुळे शरीरावर खूप घातक परिणाम होतो. रात्रीचे जागरणामुळे शरीराला पूर्णपणे आराम मिळत नाही. त्यामुळे अशा सवयी लवकरच सोडणे खूप गरजेचे आहे.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts