अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Health news :- कोरोनाची लाट ओसरली असे वाटत असताना तुलनेत वेगाने पसरण्याची क्षमता असलेला कोरोनाचा एक्स ई हा नवा व्हेरियंट राज्यात आढळून आला आहे.
मुंबईत अशा प्रकारचा रुग्ण आळून आला आहे. सुरवातील मुंबई महापालिकेने याची माहिती जाहीर केली तेव्हा केंद्रीय यंत्रणेने हे वृत्त फेटाळून लावले होते.
मात्र आता हा नवा व्हेरियंट असल्याचे स्पष्ट झाले असून नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा सावध राहून काळजी घ्यावी लागणार आहे.
मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या ६७ वर्षीय पुरुषात कोरोनाचा एक्स ई प्रकार आढळून आला आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये १२ मार्च रोजी सौम्य ताप आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली.
त्यात हे स्पष्ट झाले आहे. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित आहे. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. व्हायरसच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असते.
यामुळे सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.