ताज्या बातम्या

Benefits Of Plums : कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणावर रामबाण उपाय आहे ‘हे’ फळ, जाणून घ्या खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Benefits Of Plums : धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. सध्या कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक उपाय करूनही काहीजणांना कसलाच आराम मिळत नाही.

परंतु तुम्ही आता कोणत्याही औषधाशिवाय या आजारांवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या आहारात फक्त एका फळाचा समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे तुमचा कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारखे आजार दूर होतील.

प्लम हाडांना ताकद देत असतात. जर महिलांनी दररोज सकाळी या फळाचे सेवन केले तर त्या ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या फ्रॅक्चरपासून बचाव करू शकतात. दररोज 10 प्लम खाल्ले तर फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. वयानुसार हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढत असतो. वाळलेल्या अंजीर, वाळलेल्या स्ट्रॉबेरी, वाळलेल्या सफरचंद आणि मनुका यांच्यापेक्षा हाडे मजबूत करण्यासाठी प्लम जास्त फायदेशीर आहे.

आहेत प्लमचे भरपूर फायदे

  • प्लममध्ये खूप फायबर असून त्यामुळे पोटाशी निगडित समस्या दूर होऊन पचनसंस्था निरोगी राहते. जर तुम्ही याचे सेवन केले तर पोटात जडपणा येत नाही आणि आतड्यांनाही आराम मिळतो.
  • प्लम्समध्ये फॅटचे प्रमाण कमी असल्याने लठ्ठपणा वाढत नाही. तसेच वजन नियंत्रणात राहते.
  • यात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते.
  • व्हिटॅमिन-ए डोळ्यांना निरोगी ठेवण्यास हे मदत करते.
  • यात अनेक पोषक फायबर झेक्सॅन्थिन असते, जे डोळ्यांच्या डोळयातील पडदा मजबूत करत असते.
  • मनुका कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो. यामध्ये विरघळणारे फायबर असून जे शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करत असते.
  • केसांशी निगडित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts