ताज्या बातम्या

Best Battery Life Smartphones 2022: घरी आणा ह्या 5 बेस्ट बॅटरी लाइफसह येणारे स्मार्टफोन; किंमत आहे फक्त ..

Best Battery Life Smartphones 2022: तुम्ही देखील नवीन वर्षात एका जबरदस्त आणि बेस्ट बॅटरी लाइफसह येणाऱ्या स्मार्टफोनसाबोत एन्ट्री करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये  बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही बेस्ट बॅटरी लाइफ फोनबद्दल माहिती देणार आहोत.

जे तुम्हाला बजेटमध्ये खरेदी देखील करता येणार आहे. चला तर जाणून घ्या या बेस्ट बॅटरी लाइफसह येणाऱ्या फोनबद्दल संपूर्ण माहिती.

Nothing Phone 1

Nothing Phone 1 मध्ये 4500mAh बॅटरी आहे. तुम्ही हा फोन पूर्णपणे चार्ज करून 1 दिवस आरामात चालवू शकता. त्याची सुरुवातीची किंमत 27,499 रुपये आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसेट आहे. फोनची डिझाईनही खास आहे.

iPhone 14 Pro Max

iPhone 14 Pro Max देखील चांगल्या बॅटरी पॅकसह येतो. त्याची सुरुवातीची किंमत 139,900 रुपये आहे. जर तुमचे बजेट खूप चांगले असेल आणि एक चांगला कॅमेरा फोन घ्यायचा असेल ज्याची बॅटरी देखील उत्कृष्ट असेल, तर तुम्ही iPhone 14 Pro Max घेऊ शकता.

Motorola Moto G82

Moto G82 ला 5G सपोर्ट मिळेल. या फोनसोबत 33W चार्जिंग सपोर्ट चार्जर उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, तुम्ही दोन दिवस फोन वापरू शकाल. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट कॅमेरा सपोर्ट मिळेल. त्याची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे.

Redmi Note 11 Pro

Redmi Note 11 Pro मध्ये एक मजबूत बॅटरी पॅक देखील उपलब्ध आहे. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. या फोनची सुरुवातीची किंमत रु.17999 आहे. हा फोन 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारा सर्वोत्तम बॅटरी स्मार्टफोन असू शकतो.

iPhone 14 Plus

आयफोन 14 प्लसचे नाव सर्वोत्तम बॅटरीच्या यादीत येते. तुम्ही हा फोन एकदा पूर्णपणे चार्ज केल्यास दीड दिवस आरामात वापरता येईल. या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे. यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत.

हे पण वाचा :- 8 Seater Cars In India: ‘ह्या’ आहे देशातील बेस्ट 8 सीटर कार्स ! किंमत आहे फक्त 13 लाख ; जाणून घ्या त्यांची खासियत

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts