Best Electric Scooters : इंधनाच्या (Fuel) वाढलेल्या किमतीमुळे बाजारात (Market) एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. ग्राहक आत पेट्रोल बाइक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि इलेक्ट्रिक बाइक (Bike) खरेदी करण्याकडे लक्ष देत आहेत.
त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक लाँच करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातच इलेक्ट्रिक कंपन्यांनीही किमती (Price) वाढवायला सुरूवात केली आहे. परंतु अशा काही कंपन्या आहेत ज्या 70 हजारांच्या आत इलेक्ट्रिक स्कूटर देत आहे.
Avon E Scoot
Avon E Scoot इलेक्ट्रिक स्कूटरला 215 वॉट मोटरसह 48 V/20 Ah बॅटरी पॅक मिळतो. याचा टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 65 किमी प्रतितास पर्यंतची रेंज देते. त्याची किंमत 45,000 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Hero Electric Flash
या इलेक्ट्रिक स्कूटरला 250 W मोटरसह 51.2 V/30 Ah बॅटरी पॅक मिळतो. याचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे आणि एका चार्जवर 85 किमी प्रति तासाची रेंज देते. त्याची किंमत 59,640 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Bounce Infinity E1
या इलेक्ट्रिक स्कूटरला 1500 वॅट मोटरसह 48 V/39 Ah बॅटरी पॅक मिळतो. याचा टॉप स्पीड 65 किमी प्रतितास आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 85 किमी प्रति तासाची रेंज देते. त्याची किंमत 59,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Hero Electric Optima
Hero Electric Optima ला 1200W मोटर मिळते. यात 51.2 V/30 Ah बॅटरी पॅक आहे, ज्याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात. हे दोन प्रकारांमध्ये येते ज्यामध्ये सिंगल बॅटरी आणि ड्युअल बॅटरीचा पर्याय उपलब्ध आहे.
याशिवाय यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, वॉक असिस्ट फंक्शन, रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट अलार्मसह रिमोट लॉक, यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 62,190 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Okinawa Lite
ओकिनावा लाइट 250W BLDC मोटरसह 1.25kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे. हे जास्तीत जास्त 250 वॅट्सची शक्ती निर्माण करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर कमाल 60 किमीची रेंज मिळते. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 66,993 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.