ताज्या बातम्या

Best Mileage Petrol Car : सीएनजी कारसारखेच मायलेज देते ‘ही’ कार, 1 लिटरमध्ये धावते 27KM, किंमत फक्त 5.35 लाख

Best Mileage Petrol Car : भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक, डिझेल, सीएनजी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना नवीन कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सध्या मार्केटमध्ये अशा काही कार आहेत ज्या पेट्रोलवर चालत असून त्या सीएनजी कार इतक्या जबरदस्त मायलेज देत आहेत. इतकेच नाही तर किंमत फक्त 5.35 लाख रुपये इतकी आहे. कंपनीची ही कार 1 लिटरमध्ये 27KM धावते.ही कार कोणत्या कंपनीची आहे पहा.

किती आहे किंमत आणि प्रकार

मारुती सुझुकी सेलेरियो अशा LXi, VXi, ZXi आणि ZXi+ एकूण चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या सेलेरियोची किंमत 5.33 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.12 लाख रुपयांपर्यंत जाते. या मध्ये पाच जणांची आसनक्षमता आहे. कंपनीची ही कार रेनॉल्ट क्विड, मारुती वॅगनआर आणि टाटा टियागो सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करते.

इंजिन आणि ट्रान्समिशन जाणून घ्या…

मारुती सुझुकी सेलेरियोला 1.0-लिटर, K10C पेट्रोल इंजिन मिळते जे 66bhp आणि 89Nm टॉर्क जनरेट करत असून याचे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल युनिट आणि AGS (AMT) गिअरबॉक्सशी जोडले आहे. कंपनीच्या या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध असून आता CNG मोडमध्ये, हे इंजिन 56bhp आणि 82Nm टॉर्क निर्माण करते. याच्या मायलेजच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते पेट्रोल मोडमध्ये 26.6kmpl आणि CNG मध्ये 35.6 km/kg देते.

पहा फीचर्स

मारुती सुझुकी सेलेरियो मध्ये ग्राहकांना स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, फ्रंट पॉवर विंडो, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स मिळत आहेत. सुरक्षेसाठी यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम, सीट-बेल्ट रिमाइंडर, हिल स्टार्ट असिस्ट आणि मागील डिफॉगर मिळतात.

असे आहे डिझाइन

मारुती सुझुकी सेलेरिओला नवीन फ्रंट आणि रियर बंपर, नवीन स्वीप्टबॅक हेडलॅम्प्स, मोठ्या काळ्या इन्सर्टसह फ्रंट बंपर, फॉग लाइट्स, ब्लॅक-आउट बी-पिलर, नवीन 15-इंच ब्लॅक अलॉय व्हील मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts