Best Scooters 2022: भारतीय दुचाकी बाजारात स्कूटरची मागणी वाढत आहे. स्कूटर ही ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. त्यामुळेच स्कूटरच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. स्कूटर मार्केटमध्ये होंडा अॅक्टिव्हाचा दबदबा कायम आहे. सुझुकी ऍक्सेस आणि टीव्हीएस ज्युपिटरच्या विक्रीतही वाढ झाली आहे. चला नोव्हेंबर 2022 मधील टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सवर एक नजर टाकूया.
1. Honda Activa
Honda Activa ने भारतीय स्कूटर मार्केटमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. नोव्हेंबर महिन्यात Honda ने 175084 Activa युनिट्सची विक्री केली. Activa च्या वार्षिक विक्रीत 41.1 टक्के वाढ झाली आहे.
2. Suzuki Access
सुझुकी ऍक्सेसने TVS ज्युपिटरला मागे टाकून यादीत दुसरे स्थान पटकावले. सुझुकीने नोव्हेंबरमध्ये स्कूटरच्या 48,113 युनिट्सची विक्री केली. सुझुकी ऍक्सेसच्या विक्रीत वार्षिक 13.26 टक्के वाढ झाली आहे.
3. TVS Jupiter
TVS ने नोव्हेंबर 2022 मध्ये ज्युपिटरच्या 47422 युनिट्सची विक्री केली. TVS ज्युपिटरच्या वार्षिक विक्रीत 7.44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
4. Hero Pleasure
देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरोने गेल्या महिन्यात आपल्या प्लेजर स्कूटरच्या 19,739 युनिट्सची विक्री केली. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत, 8603 युनिट अधिक विकले गेले आहेत.
5. TVS Ntorq
TVS च्या स्पोर्टी Ntorq 125 ला बाजारात चांगली मागणी मिळत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 17003 युनिट्सची विक्री झाली. तथापि, वार्षिक विक्री 11.24 टक्क्यांनी (2154 युनिट्स) कमी झाली आहे.
6. Honda Dio
नोव्हेंबर महिन्यात 16102 ग्राहकांनी Honda Dio स्कूटरची खरेदी केली आहे. Honda Dio ने वार्षिक विक्रीत विक्रमी 88.95 टक्के वाढ नोंदवली आहे.
7. Hero Destini
हिरोने गेल्या महिन्यात डेस्टिनीच्या 15411 युनिट्सची विक्री केली. तर नोव्हेंबर 2021 मध्ये Hero Destini चे फक्त 3264 युनिट्स विकले गेले.
8. Yamaha RayZR
Yamaha ने गेल्या महिन्यात RayZR स्कूटरच्या 10795 युनिट्सची विक्री केली. तथापि, RayZR ची विक्री नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 12344 युनिट्सच्या तुलनेत 12.55 टक्के किंवा 1549 युनिट्सनी घटली आहे.
9. TVS iQube
टॉप 10 यादीत iQube ही एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे. TVS ने गेल्या महिन्यात त्याच्या EV च्या 10056 युनिट्सची विक्री केली. वार्षिक विक्री 9357 युनिट्सनी वाढली आहे.
10. Yamaha Fascino
यामाहा फॅसिनो स्कूटरने देखील 9801 युनिट्सच्या विक्रीसह टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 8202 युनिटच्या तुलनेत Fascino च्या वार्षिक विक्रीत 19.5 टक्के किंवा 1599 युनिट्सची वाढ झाली आहे.