ताज्या बातम्या

Common Eye Mistakes : सावधान! तुमच्या ‘या’ चुका डोळ्यांसाठी ठरतील घातक

Common Eye Mistakes : डोळ्यांमुळे आपल्याला सुंदर जग पाहता येते. त्यामुळे आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. डोळ्यांची दृष्टी चांगली रहावी आणि ती दिर्घकाळ टाकावी यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यायला हवी.

सध्याच्या काळात डिजिटलाईजेशन वाढल्यामुळे स्क्रिनवर काम करण्याचा अवधी वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहे. त्यासाठी आपण डोळ्यांची काळजी घेतली पाहीजे.

आपल्या सर्वांना माहीत आहे की स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बराच वेळ बसल्याने त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोळे दुखणे, त्यात जडपणा जाणवणे, डोकेदुखी, अंधुक दिसणे आणि डोळे कोरडे होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

अनेकदा यामुळे एकाग्र होण्यात आणि झोपण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे दैनंदिन जीवनात डोळ्यांवर वाईट परिणाम करणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत.

1. डोळे धुण्यासाठी गरम पाणी वापरणे

अनेकजण डोळे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात. परंतु, डोळे नेहमी थंड पाण्याने धुवावेत.

2. डोळे सतत मिचकावणे

डोळ्यांतील जडपणा आणि तणाव टाळण्यासाठी डोळे सतत मिचकावत रहा. कारण यामुळे डोळ्यांना ब्रेक तर मिळतोच आणि डोळे कोरडे होण्यापासून वाचतात. त्याचबरोबर डोळ्यांतील घाणही काढून टाकली जाते. तज्ज्ञांचे मतानुसार अनेकजण मोबाईल किंवा टीव्ही पाहत असताना डोळे मिचकावत नाहीत. त्यामुळे त्यांना डोळ्याच्या समस्या जाणवू लागतात.

3. आय ड्रॉप्सचा अति वापर

अनेकजण कोणत्याही प्रकारच्या वेदनेपासूनआराम मिळविण्यासाठी आय ड्रॉप्सचा अति वापर करतात. थोडा वेळ त्याचा परिणाम जाणवतो, परंतु दीर्घकाळ वापरल्याने डोळे कोरडे पडतात.

4. झोपताना आय मास्कचा वापर करणे 

अनेकांना झोपताना आय मास्क वापरण्याची सवय असते. परंतु, सतत आय मास्क वापरणे डोळ्यांसाठी फायदेशीर नाही. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की,डोळ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून हॉट पॅकऐवजी कोल्ड पॅक वापरा.

5. डोळे चोळणे

अनेकजण खाज सुटणे किंवा दुसऱ्या कारणांमुळे डोळे चोळू लागतात. परंतु, तसे करणे अतिशय धोकादायक आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, डोळ्यांमधील एक पातळ थरामुळे त्यांचे संरक्षण होते. डोळे चोळल्याने थराला इजा होते. त्यामुळे डोळे चोळण्याऐवजी ते थंड पाण्याने धुवा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts