अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- देशात खेळ पुरस्काराचे नामांतर चालू आहे एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यात आता एका प्रसिद्ध धरणाचे नामकरण करण्याचा विचार सुरु आहे.
नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदरा धरणाचे नाव बदलले जाणार आहे. आदिवासी विकास परिषद व अन्य आदिवासी संघटना जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत 9 ऑगस्टला क्रांती दिनी भंडारदरा धरणाचे नामांतर करणार असून या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
आदिवासी दिन उत्साहात शांततेने साजरा करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी या नामकरण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार पिचड यांनी केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय मंत्री तथा आदिवासी विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार वैभवराव पिचडयांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा जलाशयावर हजारो तरुण एकत्र येऊन भंडारदरा जलाशयवरजाऊन क्रांतिवीर राघोजी भांगरे हे नाव सकाळी दहा वाजता देण्यात येणार आहे.
याबाबत राज्य व केंद्र सरकारला (पत्रव्यवहार केला असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. आदिवासी समाजातील महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी तसेच एकजुटीचे प्रतीक असणाऱ्या आदिवासी दिनानिमित्त येणाऱ्या ९ ऑगस्ट रोजी विल्सन डॅमचे “आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे धरण” असे नामकरण केले जाणार आहे.