Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. बिग बी यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
ते म्हणतात, ‘आत्ताच माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनी चाचणी घ्या,’ असे आवाहनही बच्चन यांनी केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही जुलै २०२० मध्ये अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांना कोरोना झाला होता. या दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
तर कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या रॉय, आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आता बच्चन याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कुटूंबातील अन्य सदस्यांच्या टेस्टही केल्या जातील.