Ration Card Update : देशातील अनेकजण मोफत रेशनचा लाभ घेतात. जर तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.
कारण आता 10 लाख शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ आणि तेलाचा लाभ घेता येणार नाही. सरकारने याबाबत एक यादी तयार केली आहे. या यादीत तुमचेही नाव नाही ना? लगेच तपासा.
या लोकांवर होणार कारवाई
सरकारकडून मागील अनेक दिवसांपासून शिधापत्रिकाधारकांना मदत केली जात आहे, परंतु, अनेकजण अपात्र ठरले आहेत. सरकारने या लोकांवर कडक कारवाई करण्यास तयारी सुरू केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, देशात 10 लाख लोक फसव्या पद्धतीने रेशनचा फायदा घेत असून त्यांची यादी तयार केली आहे. देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना रेशनचा लाभ मिळत आहे. यामध्ये अपात्रांची संख्या मोठी आहे.
या लोकांना होणार फायदा
सरकारने अपात्रांसाठी नियम कडक केले आहेत, त्यांच्याकडून वसुली केली जाईल अशीही चर्चा आहे. म्हणण्यानुसार अपात्रांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे. प्रथम आयकर भरणाऱ्याचे नाव चिन्हांकित केले आहे. त्यांच्याकडे 10 बिघापेक्षा जास्त जमीन नसावी.
त्याच बरोबर काही जण असेही आहेत जे मोफत रेशन घेऊन ते जास्त किमतीला विकत आहेत. असे करणाऱ्या लोकांची नावे हटवली जातील. उत्तर प्रदेशमध्ये अपात्रांची सर्वात जास्त आहे.
अपात्रांची यादी सरकार लवकरच शिधावाटप विक्रेत्यांना पाठवणार आहे. यानंतर, या लोकांची नावे चिन्हांकित करून त्यांची कार्डे रद्द केली जातील.