ताज्या बातम्या

Ahmednagar Muharram : मोहरम निमित्त जिल्हा पोलिसांचा मोठा निर्णय ; शहरात आता ..

Ahmednagar Muharram :  अहमदनगर शहरात मोहरमची (Muharram) सांगता ९ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. ८ ते ९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान कत्तल की रात्र आणि विसर्जन मिरवणुक शहरात पार पडणार आहे.
या मिरवणुकीदरम्यान शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी मनोज पाटील (Manoj Patil
) यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
फौजदारी दंड प्रक्रीया संहिता चे कलम १४४(१) तथा महाराष्ट्र शासन अधिसुचना क्र. MSC१२७४ / VF. दि. १ एप्रिल, १९७४ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन ८ ऑगस्ट ,२०२२ चे ००.०० वाजेपासून ते ९ ऑगस्ट ,२०२२ चे २४.०० वाजेपर्यंत काढण्यात येणा-या मिरवणूकीत पुढील कृत्य करण्यास मनाई केली आहे.
यात १) कपडे काढून अंग प्रदर्शन करणे. २) बॉडी शो करणे. ३) आक्षेपार्ह अंग विक्षेप करणे. ४) अश्लील हावभाव करणे. (५) अंगावरील कपडे फाडून काढून नाच करणे.
यासंदर्भात सदरचा आदेश हा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी लागू राहील,असे जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts