ताज्या बातम्या

State government: राज्य सरकारचा मोठा निर्णय ..!  ‘त्या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार

State government:  जाता जाता राज्य सरकारने (State government) एक मोठा निणर्य घेतला आहे.  शेतकऱ्यांसाठी (farmers) राज्यात सुरु असलेल्या शेततळे योजनेसाठी (Setatale yojana) आता शेतकर्‍यांना 50 हजार ऐवजी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

याबाबतचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती नंतर सरकारने शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाणीटंचाईच्यादृष्टीने शेततळे उभारण्यासाठी योजना आणली. राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. 

शेतात पाणी साठवून ठेवत ठिबक पद्धतीने पाणी देऊन अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती आज समृद्ध बनवली आहे. आता हेच शेततळे आता शेतकर्‍यांसाठी दुहेरी वरदान ठरलंय. मत्स्य पालन योजनेमुळे पाणीसाठा करणार्‍या या तळ्यातून आता नवा जोडधंदा शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यात आता अनुदानात आणखी वाढ झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts