Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
जितेंद्र आव्हाड आजच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करू शकतात अशी माहिती मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने १ तासासाठी निर्णय राखून ठेवला होता.
दरम्यान आता जितेंद्र आव्हाड यांना ठाणे शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. न्यायाधीश डी.एस. पाल यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी विवियामा मॉलमध्ये प्रेसखाला मारहाण केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमे वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.
जितेंद्रची बाजू मांडणारे वकील प्रशांत कदम यांनी त्यांच्या अटकेविरोधात न्यायालयात युक्तिवाद केला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांवर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याचे कदम म्हणाले.
ते म्हणाले की नोंदवलेले गुन्हे हेतुपुरस्सर होते आणि कलम 7 वाढवता येत नाही, कारण अशी तरतूद 1932 मध्ये करण्यात आली होती, जी महाराष्ट्रात लागू नाही. यानंतर कदम यांनीही ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.