ताज्या बातम्या

दहावी बारावी परिक्षेबाबत मोठी बातमी ! परिक्षा होणार …..

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने, येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या

अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहे. ही ऑनलाईन बैठक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थित पार पडली आहे.

तसेच मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती.

मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केल्या आहे.

राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवण्याचे येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Maharashtra

Recent Posts