Maharashtra News:मनी लाँडरिंगप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत. हे आरोप फेटाळत देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावरील सुनावणी दीर्घकाळ रखडली.
या विरोधात त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांचा अर्ज तातडीने निकाल काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मंगळवारी कोर्टाने आपला निर्णय दिला असून देशमुख यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला.
जामीन मिळूनही देशमुख यांना लगेच बाहेर येता येणार नाही. कारण या निर्णयाला इडीकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयला १२ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
शिवाय जामीन केवळ ईडीच्या खटल्यात मंजूर करण्यात आलेला आहे. सीबाआयकडून दाखल गुन्ह्यात जामीन मिळालेला नाही. त्यामुळे तर्त तरी देशमुख यांना तुरूंगाबाहेर येता येणार नाही.