Gold Price : तुम्ही सोने (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सोन्याच्या सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच कमी किमतीत सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
सोन्याच्या आजच्या किमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केली, तर सोने अजूनही 9,000 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त आहे.
आज सोन्याचा भाव
मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली. गुड रिटर्न्सनुसार, बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,900 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता.
यानंतर बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 500 रुपयांनी घसरला. आता सोन्याचा भाव 46,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.
दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, मंगळवारी त्यात 160 रुपये प्रति दहा ग्रॅमची वाढ दिसून आली. यानंतर मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,160 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता.
यानंतर बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 540 रुपयांनी घसरला. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव सराफा बाजारात 50,620 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.
सोन्याचे दर विक्रमी दरापेक्षा इतके घसरले आहेत
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये, सोन्याने 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅम हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.
आज जर आपण सोन्याच्या सध्याच्या 46,400 रुपये प्रति दहा ग्रॅम किंमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केली, तर तुम्हाला असे दिसून येईल की सध्या सोने प्रति दहा ग्रॅम रुपये 9,000 ने स्वस्त आहे.