PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता (12th installment) सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी (Registration) करत असताना चुका केल्या होत्या त्यांचे पैसे अडकू शकतात.
केंद्र सरकारकडून (Central Govt) या योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबर महिन्यात कोणत्याही तारखेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी करू शकते. मात्र, हप्त्याचे पैसे हस्तांतरित (Transferred) करण्याबाबत भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरण केल्यानंतर, तुम्ही त्याची स्थिती सहज तपासू शकता. स्थिती तपासताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/
ला भेट द्यावी लागेल. पुढील पायरीवर, फार्मर कॉर्नरवर जा आणि लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक निवडावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोडवर क्लिक करा. ही प्रक्रिया केल्यानंतर जनरेट OTP चा पर्याय निवडा. या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही तुमची स्थिती सहज तपासू शकता.
सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसीसाठी (E-KYC) 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. ई-केवायसीची अंतिम मुदत संपली आहे. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी केलेले नाही त्यांचे बाराव्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.