national pension scheme :- केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक विशेष योजना राबवल्या जातात. या योजनापैकी आज आम्ही तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) शी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत.
जर तुम्ही PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडले असेल तर हे काम 31 मार्चपूर्वी करा नाहीतर तुमचे खाते बंद केले जाईल. काय आहे ते काम जाणून घेऊया-
खाते होतील बंद –
जर तुम्ही या योजनांमध्ये कमीत-कमी शिल्लक रक्कम जमा केली नाही तर तुमचे खाते बंद केले जाईल. खाते बंद झाल्यानंतर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही 31 तारखेपूर्वी त्याच्यामध्ये किमान शिल्लक जमा करा.
ग्राहकांना मिळणार विशेष लाभ –
सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये ग्राहकांना करबचतीची सुविधाही मिळते. यासाठी तुमचे खाते सक्रिय असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला तुमच्या या योजनांमध्ये किमान गुंतवणूक ठेवावी लागेकिमान
कमीत-कमी रक्कम जमा करा –
जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात या खात्यांमध्ये पैसे नसेल, तर तुम्ही त्यात कमीत-कमी रक्कम 31 मार्च पूर्वी टाकली पाहिजे, जेणेकरून तुमचे खाते चालू राहील अन्यथा तुम्हाला यासाठी दंड भरावा लागेल. .
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) –
PPF खातेधारकांसाठी कमीत कमी शिल्लक रुपये 500 आहे म्हणजेच तुम्हाला त्यात दरवर्षी कमीत कमी 500 रुपये गुंतवावे लागतील अन्यथा तुमचे खाते बंद केले जाईल.
यामध्ये पैसे टाकण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे, त्याआधी तुम्ही ही कमीत कमी शिल्लक रक्कम खात्यावर ठेवा. जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला प्रति वर्ष 50 रुपये दंड भरावा लागेल.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) –
जर आपण NPS बद्दल बोललो, तर टियर-1 खातेधारकांसाठी किमान शिल्लक 1000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही हे योगदान दिले नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होईल, ज्यामध्ये तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागेल.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) –
याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेबद्दल सांगायचे तर, या सरकारी योजनेअंतर्गत, तुम्हाला एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करावे लागतील.