ताज्या बातम्या

मोठी बातमी ! राज्यात ‘इतक्या’ जागांसाठी होणार पोलीस भरती

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- महाराष्ट्र पोलीसात भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत.

त्याशिवाय येत्या काही दिवसात 7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.

तसेच मंत्रीमंडळाने या भरतीला परवानगी दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असं आश्वासन देखील वळसे-पाटलांनी दिलं आहे.

पोलीस ठाण्यांच्या इमारतीची सुधारणा करण्याचा निर्णय देखील गृहमंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. पोलीस शिपाई निवृत्तीच्या वेळी पीएसआय होणार पोलीस सेवेत शिपाई म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास निवृत्त होताना

30 वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून पोलीस शिपायांना आता निवृत्तीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts