ताज्या बातम्या

BIG News | भोंग्यांचा विषयही आता केंद्राच्या कोर्टात, बैठकीत असं ठरलं

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंबंधी नियम करण्याचा विषयही आता केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, या विषयावर जर केंद्र सरकारनेच नियम केले तर ते संपूर्ण देशाला लागू होतील. राज्यात वेगळे नियम करण्याची गरज भासणार नाही.

सुप्रिम कोर्टाने हा आदेश दिलेला असल्याने यावर केंद्रानेच नियम केले पाहिजे. राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ या विषयावर लवकरच केंद्र सरकारला भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आधीच मनसे आणि भाजपच्या बहिष्कारामुळे गाजलेल्या या बैठकीत राज्य पातळीवर काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts