अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- देशात सर्वत्र इडीच्या कारवाईचा भडका उडाला आहे, राज्यातही या केंद्रीय यंत्रनेचा अनेक राजकारणी व उद्योगपती लोकांवर ससेमिरा सुरू आहे. रोज कुठे ना कुठे ईडी (ED), सीबीआय, आयटी या केंद्र यंत्रणेची छापेमारी होतच असते.
हाती आलेल्या माहितीनुसार, ही केंद्रीय यंत्रणा आता अतिश्रीमंत शेतकऱ्यांचा मागोवा घेणार आहे. अतिश्रीमंत शेतकऱ्यांकडे आता आयकर विभाग जातीने लक्ष घालणार आहे.
लवकरच अतिश्रीमंत शेतकऱ्यांची यादी जमा केली जाईल आणि ते शेतकरी 100% करमुक्त आहेत की नाही याबाबत छाननी केली जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) 10 लाखापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती जाणून घेणार आहे.
भारतीय कायद्याने शेतीतून प्राप्त होणारे उत्पन्न हे करमुक्त ठेवण्यात आले आहे. याचाच फायदा उचलत काही लोक अनैतिक व्यवहार करून शेतीचे उत्पन्न दाखवून देतात.
यातून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस येत आहेत यामुळे आता आयकर विभाग (Income tax department) अतिश्रीमंत शेतकऱ्यांचा मागोवा घेण्यास सरसावले असल्याचे समजत आहे.
तेलंगणातील एका शेतकऱ्याने शेतीतून तब्बल एक कोटी 9 लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं असल्याचा दावा केला आहे यामुळे आयकर विभागाचा रडार आता अतिश्रीमंत शेतकऱ्यांकडे (super-rich farmers) वळला असल्याचे सांगितले जात आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय आयकर विभागाला अशी शंका आहे की अनेकांनी शेतीचा आडोसा घेतला आहे म्हणजेच इतर मार्गाने कमवलेला पैसा करमुक्त ठेवण्यासाठी शेतीचे उत्पन्न म्हणून अनेकांनी दाखवला आहे.
यामुळे वित्त विभागाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून ज्या शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे त्यांच्या उत्पन्नाची आता आयकर विभागाकडून छाननी होणार आहे.
या चौकशी दरम्यान संबंधित शेतकऱ्यांचे उत्पन्न हे खरोखरच शेतीतून प्राप्त केले केले आहे का? हे जाणून घेतले जाणार आहे.
म्हणूनच आयकर विभागाच्या रडारवर आता अतिश्रीमंत शेतकरी आला असून लवकरच अतिश्रीमंत शेतकऱ्यांनी कमवलेले पैसे शेतीतून प्राप्त केले आहेत की यामागे काही गौडबंगाल आहे हे उघडकीस येणार आहे.