अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.(Big news)
जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल बारा जाणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 14 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान जखमी तसेच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे येथे युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच जम्मू काश्मीर सरकारने या चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलंय.
माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार तर १३ जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे २:४५ च्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, काही जणांमध्ये वाद झाल्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.